
निसर्गसौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्यातील बापर्डे गावात श्री ब्राह्मण देवाचे मंदिर आहे. ग्रामस्थ व दानशूर व्यक्तींच्या देणग्यातून, बापर्डे गावच्या ग्रामस्थांनी, आपल्या ग्रामदेवता म्हणजे श्री ब्राह्मण देव यांचे मंदिर बांधले.नवसाला पावणारा देव अशी या देवाची ख्याती आहे. प्रतिवर्षी १५ फेब्रुवारी या दिवशी बापर्डे येथे श्री ब्राह्मणदेवाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. हा वर्धापन दिन मोठया थाटामाटात साजरा केला जातो. एसटी बसेसची चांगली सुविधा असल्याने मुंबईकर एसटी बसेसने कुटूंबियांसमवेत या उत्सवासाठी येतात. या आदर्श गावात अनेक सुखसुविधा उपलब्ध आहेत. हे गाव अतिशय रम्य असे असून सॄष्टीसौंदर्याने नटलेले आहे. श्री ब्राह्मणदेव दु:खीपीडितांच्या नवसाला पावतो व त्यांची दु:खे निवारण करतो. श्री ब्राह्मणदेवाचा वर्धापन दिन मोठया थाटामाटात दरवर्षी येथे साजरा केला जातो.
या गावात हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. हा हापूस आंबा मुंबई व परदेशात पेटया भरून पाठवला जातो. ग्रामस्थ या हापूस आंब्याच्या व्यापार करतात. पाटाच्या पाण्याचे संशोधन करण्याकरिता आपल्या भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाटाच्या पाण्याची माहिती ग्रामस्थांना विचारली. त्यांनी आपल्या माहितीप्रमाणे त्या भूगर्भ शास्त्रज्ञांना सांगितले.ईश्वराची करणी नारळात पाणी या तत्वावर श्री ब्राह्मणदेवाचे ग्रामस्थ आपले जीवन जगवितात. भूगर्भ शास्त्रज्ञांनी महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली की, या बापर्डे गावचे भले करायचे असेल तर फिनलँड सरकारने लाखों रूपयांची देणगी देऊन गावातील ग्रामस्थांच्या सुख सोयीकरिता दहा हजार लिटरची एक टाकी बांधून दयावी. या टाकीतील पाण्याव्दारे सर्व ग्रामस्थांच्या घरोघरी नळपाणी योजना राबविण्यात आली. ग्रामस्थ या योजनेमुळे सुखी झाले आहेत.
आणखी एक गोष्ट आहे ती अशी की, ब्राह्मणदेवाच्या उत्सवानिमित्त पूजा करतानाचे दॄश्य पाहताना भक्तांचे तनमन हरपून जाते. भक्तगण ब्राह्मणदेवाच्या चरणी नतमस्तक होऊन आशिर्वाद घेतात. ढोल, ताशा, फटाक्यांच्या आतषबाजीत व भजनाच्या आवाजात नाचतगाजत मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात. या प्रसंगी बहुसंख्य मुंबईहून आलेले गावोगावचे ग्रामस्थ हा सोहळा डोळे भरून पाहतात. या वर्धापन दिन प्रित्यर्थ परिसरातील गावोगावची भजने, मुंबई प्रस्थान भजनी मंडळे व कलावंत हजर असतात. या निमित्त परिसरातील ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित राहतात. हा वर्धापन दिनाचा सोहळा भक्तांचा आनंद व्दिगुणीत करतो व त्यामुळे सारा परिसर खुलून दिसतो.
श्री . देवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ, बापर्डे - जुवेश्वर
सर्वांना शाळेच्या मदती साठी आवाहन करण्यात येत आहे,
श्री. वामन भास्कर नाईकधुरे : २४६७०५
श्री. नारायण गोपाळ नाईकधुरे : २४६८६४
श्री. पर्शुराम महिपत नाईकधुरे : २४६२२९
डॉ. श्री. सुरेश राजाराम नाईकधुरे : २४६८४०
श्री. महेंद्र वसंत नाईकधुरे : २४६८९३
श्री. मनोहर रामचंद्र नाईकधुरे : २४६८४७
श्री. पुरूषोत्तम नारायण नाईकधुरे : २४६८०८
श्री. सखाराम शंकर नाईकधुरे : २४६८०९
श्री. सखाराम लक्ष्मण नाईकधुरे : २४६८०७
श्री. सुनिल बाळकृष्ण नाईकधुरे : २४६८६५
श्री. प्रल्हाद बाळकृष्ण नाईकधुरे : २४६८३२
श्री. पर्शुराम सिताराम परब : २८०६०४
श्री. सुधाकर सखाराम आंगणे : २८०२९९
श्री. साबाजीशेठ नामदेव नाईकधुरे : २४६८१३
श्री. सहदेव धोंडू नाईकधुरे : २४६८६२
श्री. सिताराम धाकू नाईकधुरे : २८०२२६
श्री. विठ्ठल रामचंद्र नाईकधुरे : २४६८७८
श्री. बाळकृष्ण दिनकर नाईकधुरे : २४६८११
श्री. चंद्रकांत नामदेव नाईकधुरे : २८०२८२
श्री. शाहू लक्ष्मण नाईकधुरे
श्री. शशिदत्त जनार्दन नाईकधुरे
श्री. दामोदर दत्तात्रय नाईकधुरे
श्री. गोपाळ दत्तात्रय नाईकधुरे
श्री. मधुसुदन नारायण नाईकधुरे
श्री. रामकृष्ण केशव नाईकधुरे
श्री. सयाजी राजाराम नाईकधुरे
श्री. तुकाराम भास्कर नाईकधुरे
श्री. लवू धाकू परब
श्री. रामदास तुळाजी नाईकधुरे
श्री. घनश्याम गणपत नाईकधुरे
श्री. यशवंत दत्ताराम नाईकधुरे
श्री. प्रविण ज्ञानदेव नाईकधुरे
श्री. केशव रामचंद्र नाईकधुरे
श्री. दिवाकर भाऊ वासगे
श्री. विनोद प्रभाकर नाईकधुरे
श्री. अनाजी बाबाजी नाईकधुरे
श्री. प्रभाकर कानू नाईकधुरे
श्री. विठ्ठल भागोजी नाईकधुरे
श्री. राघोजी भाऊ नाईकधुरे
श्री. संतोष दत्ताराम नाईकधुरे
श्री. रविंद्र तुकाराम नाईकधुरे
श्री . देवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ, बापर्डे - जुवेश्वर
सर्वांना शाळेच्या मदती साठी आवाहन करण्यात येत आहे,
त्यासाठी मंडळाचे सचिव श्री दिनेश बाळकृष्ण नाईकधुरे ९८६९२२५२०६ यांच्याशी संपर्क साधावा
श्री ब्राह्मणदेव मंदिर
श्री ब्राह्मणदेव मंदिर