समस्त नाईकधुरे आणि मित्र परिवाराचे
या संकेत स्थळावर स्वागत..
या संकेत स्थळावर स्वागत..
श्री ब्राहमणदेवाच्या व श्री पावणाईदेवीच्या कृपाशिर्वादाने आपण आपल्या घरी मंगल कार्य आरंभले की लगेच आपणांस आनंद होतो. प्रथम आपण मित्र परिवाराला त्वरित कळवितो. नंतर वाटचाल करतो ती आप्तेष्ट.
सध्याची गतीमान जीवन पद्धती व नोकरी धंदयामुळे पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे आपला समाजात वावर कमी असतो. वेळ प्रसंगी कुणाचा तरी नंबर व पत्ता हवा असल्यास तो वेळेवर कसा मिळवायचा ? आपणा सर्वांना भेडसावणा-या या प्रश्नाचा विचार मनात घोळत असताना नाईकधुरे विकास मंडळाच्या संकेत स्थळाची संकल्पना सुचली.
हा प्रकल्प साकारताना अनेक जणांनी सहकार्य केले. या सर्वांचे ऋण न विसरता येण्यासारखेच. आपणा सर्वांच्या कृपाशिर्वादानेच कितीतरी तांत्रिक, प्रासंगिक अडचणीवर मात करीत मनातला हा संकल्प साकारला. लग्न, नामकरण, वाढदिवस व इतर मंगल कार्य यासाठी हे संकेत स्थळ निश्चितच उपयोगी पडेल. या संकेत स्थळाचे आपण सर्व उत्स्फुर्तपणे स्वागत कराल! तरी या मध्ये काही त्रुटी आढळल्यास तसेच या संदर्भात काही सुचना असल्यास आम्हांस विना संकोच कळवावे ही आपणांस नम्र विनंती. आपणा सर्वांच्या सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार. धन्यवाद !
आपले नम्र,